Cycling is good for health – MLA Chetan Tupe Patil
सायकल चालवणे आरोग्यासाठी उत्तम – आमदार चेतन तुपे पाटील
आरोग्यासाठी व्यायाम करणे आणि सायकल चालवणे हे उत्तम
हडपसर : सध्या धावपळीच्या जीवनात व्यायाम व आरोग्य याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे मानवाला अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी जडत आहेत. आरोग्यासाठी व्यायाम करणे आणि सायकल चालवणे हे उत्तम आहे.परंतु सायकल चालवताना रहदारीचा,वाहनांचा विचार करून सावधपणे सायकल चालवावी असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन व आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले.साधना विद्यालयात रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने विद्यार्थ्यांना अत्यंत माफक दरात सायकल वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
विद्यार्थ्यांसाठी 21 गिअरची सायकल 7000 रूपयांना तर साधी सायकल 4000 रूपयांना उपलब्ध करून देण्यात आली.
याप्रसंगी. विद्यमान आमदार मा.चेतन दादा तुपे, साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक दिलीप तुपे,सुरेश तिटकारे, अशोक कोलते,रांगोळीकार रमेश खुटारकर,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे,बॅक प्रतिनिधी सचिन आढळराव, उपमुख्याध्यापिका योजना निकम,उपप्राचार्य डाॅ. अमिरुद्दीन सिद्दीकी,
पर्यवेक्षक शिवाजी मोहिते , कुमार बनसोडे,माधुरी राऊत ,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे, पांडूरंग गाडेकर ,धनाजी सावंत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लालासाहेब खलाटे यांनी केले. तर कार्यक्रमाचे निवेदन अनिल वाव्हळ यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सायकल चालवणे आरोग्यासाठी उत्तम – आमदार चेतन तुपे पाटील”