After the successful landing of Chandrayaan-3, a celebration was held at the Janaseva Cooperative Bank.
चांद्रयान-३” च्या यशस्वी लॅडिंग नंतर जनसेवा सहकारी बँकेत पेढे वाटून आनंदोत्सव
हडपसर : जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर, पुणे येथील मुख्य कार्यालयात “ चांद्रयान-३” च्या यशस्वी लॅडिंगच्या निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यशस्वी लॅडिंग झाल्याने इस्रो अध्यक्ष श्री. एस. सोमनाथ व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करत व भारत मातेचा जयघोष करत जनसेवा बँकेच्या सर्व सेवकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरीष पोळेकर यांनी आनंदोत्सव साजरा करताना म्हणाले कि बँक हि सातत्याने तंत्रज्ञान व ग्राहक सुरक्षितता यासाठी प्रयत्नशील असते ते केवळ अशा भारतीय तंत्रज्ञान व संशोधक यांच्या प्रेरणेने, यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र हिरेमठ, उपाध्यक्ष श्री.रवी तुपे तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख श्री.शशिकांत पडळकर व श्री.भारत टिळेकर व मुख्य कार्यालयातील सर्व सेवक व महिला सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
जनसेवा सहकारी बँकेबद्दल
जनसेवा सहकारी बँक ही महाराष्ट्रातील आघाडीची सहकारी बँक आहे. १९७२ मध्ये स्थापन झालेल्या बँकेच्या ४० पेक्षा जास्त शाखा आहेत. जनसेवा सहकारी बँक आपल्या सभासदांना बचत खाती, कर्जे आणि गुंतवणूक उत्पादनांसह वित्तीय उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी देते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “चांद्रयान-३” च्या यशस्वी लॅडिंग नंतर जनसेवा सहकारी बँकेत पेढे वाटून आनंदोत्सव”