‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे २८ ऑगस्ट रोजी आयोजन

state level school competition gymnastics competition राज्यस्तरीय शालेय स्पर्धा जिम्नॅस्टिक्स स्पर्धा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

‘Shiv Chhatrapati State Sports Award’ awarding ceremony is on 28th August

‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे २८ ऑगस्ट रोजी आयोजन

बालेवाडी येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे उद्या २८ ऑगस्ट रोजी आयोजन – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचे पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे सायंकाळी पाच वाजता प्रदान करण्यात येणार आहेत.Taking inspiration from the Shiv Chhatrapati Award-winning athletes, the youth of the state will turn to sports in larger numbers शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येनं खेळांकडे वळतील हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

हा पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, तसेच क्रिडापट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या सोहळयात तीन वर्षांचे एकूण ११९ पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार (सन २०१९-२० ) श्री. श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे) यांना, (सन २०२०-२१) श्री दिलीप बळवंत वेंगसरकर आणि (सन २०२१-२२) श्री.आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना प्रदान करण्यात येणार असून विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील , विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
Spread the love

One Comment on “‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे २८ ऑगस्ट रोजी आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *