जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्ण पदक

Javelin thrower Neeraj Chopra wins a gold medal at the World Athletics Championships जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्ण पदक हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Javelin thrower Neeraj Chopra wins a gold medal at the World Athletics Championships

जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्ण पदक

जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेत जिंकले पहिले सुवर्णपद

बुडापेस्ट : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत त्याने 88.17 मीटर लांब भाला फेकला. हा भालाफेक स्पर्धेतील भारतीय खेळाडूचा सर्वोत्तम मारा आहे.Javelin thrower Neeraj Chopra wins a gold medal at the World Athletics Championships
जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्ण पदक
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

चोप्राने या स्पर्धेत दुसऱ्याच प्रयत्नात 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावले. त्याच्या या प्रयत्नाची पुनरावृत्ती त्याने चौथ्या प्रयत्नात केली. त्याच्या या प्रयत्नाने तो या स्पर्धेचा विजेता ठरला.

चोप्रा यापूर्वी 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकला होता. तो वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

भारताला या स्पर्धेमध्ये मिळालेलं हे पहिलंच सुवर्णपदक असून, त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. नीरज चोप्रा हा क्रीडा जगतातल्या अतुलनीय गुणवत्तेचं प्रतिक आहे, असं सांगत मोदी यांनी त्याचा ध्यास आणि अचूकता या गुणांचं कौतुक केलं आहे.

चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चोप्राच्या या कामगिरीने भारतीय ऍथलेटिक्समध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. त्याच्या या कामगिरीने देशातील तरुणांना प्रेरणा मिळेल आणि तेही ऍथलेटिक्समध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित होतील.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही नीरज चोप्राचं या नव्या विक्रमाबद्दल अभिनंदन केलं आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीम याला रौप्य पदक, तर चेकोस्लोव्हाकियाच्या जेकब वाडलेजगॉट याला कांस्यपदक मिळालं. भारताचा किशोर जेना याला पाचव्या, तर डी पी मनू याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

महिलांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेतभारताच्या पारुल चौधरी हिला अकरावं स्थान मिळालं. पण 2024 मधील पॅरीस ऑलीम्पिकस्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. या स्पर्धेत आशियाई विक्रम नोंदवत अंतिमसाठी पात्र ठरल्याबद्दल भारताच्या रिले संघातल्या महम्मद अनास याहिया, अमोज जेकब, महम्मद अजमल वरियातोडी, आणि राजेश रमेस यांचही प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे.

भालाफेकपटू नीरज चोप्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथे सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत ८८.१७ मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक ॲथलेटीक्सचं पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

०२१ च्या टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्णपदकानंतर, जागतिक ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेतील नीरजची आजची सुवर्ण कामगिरी कोट्यवधी भारतीयांचा सन्मान वाढवणारी, भारतीय क्रीडाक्षेत्राला ऊर्जा देणारी, देशातील तरुण पिढीला खेळांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीचं कौतुक करुन त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेत आतापर्यंत भारताला केवळ तीन पदके मिळाली आहेत. २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. गेल्यावर्षी नीरज चोप्रा याने रौप्यपदक जिंकले होते. यंदा सुवर्णपदकाला गवसणी घालून त्याने देशासाठी जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेतील पदकांचं वर्तुळ पूर्ण केले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी चोप्राच्या सुवर्णकामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

याच स्पर्धेत भालाफेकपटू किशोर जाना याने ८४.७७ मीटर भालाफेक करून पाचवे स्थान मिळविले आहे. भालाफेकपटू डी.पी. मनू याने ८४.१४ मीटर भालाफेक करून सहावे स्थान मिळविले आहे. या दोघांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले असून भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
पांढरी वाघीण सीताच्या, अवनी आणि व्योम या बछड्यांचा पहिला वाढदिवस झाला थाटात साजरा’
Spread the love

One Comment on “जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्ण पदक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *