भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 50 कोटींचा टप्पा.

Vaccination

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 50 कोटींचा टप्पा.

Mission Vaccination
Mission Vaccination

गेल्या 24 तासात सुमारे 50 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

रुग्ण बरे होण्याचा दर 97.37% वर स्थिर.

गेल्या 24 तासात 38,628 नव्या रुग्णांची नोंद.

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या (4,12,153) सध्या एकूण रुग्णसंख्येच्या केवळ 1.29%.

दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर (2.21%), गेल्या 12 दिवसांपासून 3% पेक्षा कमी.

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार  एकूण 58,08,344 सत्रांमध्ये, 50,10,09,609 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 49,55,138 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3,10,55,861 तर गेल्या 24 तासात 40,017 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर 97.37% झाला आहे.

भारतात गेल्या 24 तासात 38,628 नव्या रुग्णांची नोंद झाली.

सलग 41 दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.

भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 4,12,153 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.29% आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 17,50,081 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 47.83 कोटींपेक्षा अधिक (47,83,16,964) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर 2.39% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.21% आहे. गेल्या 12 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 3% पेक्षा कमी तर सलग 61 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *