जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे उद्घाटन

Inauguration of Prototype of World's First BS6 Stage II 'Electrified Flex Fuel Vehicle' जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे उद्घाटन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Inauguration of Prototype of World’s First BS6 Stage II ‘Electrified Flex Fuel Vehicle’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे उद्घाटन

केंद्र सरकारने इथेनॉलच्या वापरावर दिलेला भर उर्जेच्या संदर्भातील स्वयंपूर्णता मिळवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, उर्जादाते म्हणून त्यांच्यात स्थित्यंतर घडवून आणणे या उद्दिष्टांसह त्यांना अन्नदाता म्हणून मदत करणे आणि पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव ठेवणे यांना अनुसरून आहे: केंद्रीय मंत्री गडकरीInauguration of Prototype of World's First BS6 Stage II 'Electrified Flex Fuel Vehicle'
जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे उद्घाटन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्‍ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली येथे जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे उद्घाटन केले. हे वाहन टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने विकसित केले आहे. या कार्यक्रमाला, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे, टोयोटा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझु योशीमुरा, किर्लोस्कर सिस्टिम्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली किर्लोस्कर,जपानच्या दूतावासातील राजदूत, सरकारी अधिकारी यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, इथेनॉल हे स्वदेशी, पर्यावरण-स्नेही आणि नवीकरणीय इंधन असून भारतात या इंधनाला मोठा वाव आहे. मोदी सरकारने इथेनॉलच्या वापरावर दिलेला भर उर्जेच्या संदर्भातील स्वयंपूर्णता मिळवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, उर्जादाते म्हणून त्यांच्यात स्थित्यंतर घडवून आणणे या उद्दिष्टांसह त्यांना अन्नदाता म्हणून मदत करणे आणि पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव टाकणे सुरु ठेवणे यांना अनुसरून आहे. ते म्हणाले की ज्या दिवशी इथेनॉलची अर्थव्यवस्था 2 लाख कोटी रुपयांची होईल तेव्हा कृषी क्षेत्राच्या विकासाचा दर सध्याच्या 12% वरुन 20% पर्यंत पोहोचेल. जैवइंधनांच्या क्षेत्रातील अभिनव संशोधनांबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आसाममधील नुमलीगड येथे भारतीय तेल महामंडळाने उभारलेल्या तेल शुद्धीकरण केंद्राचा उल्लेख चर्चा केला. या केंद्रामध्ये जैवइथेनॉल निर्मितीसाठी बांबूचा वापर केला जातो.

आज उद्घाटन झालेले हे अभिनव पद्धतीचे वाहन इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे आणि त्याची निर्मिती करताना भारताच्या अधिक कठोर उत्सर्जनविषयक मानकांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे ते जागतिक पातळीवरील सर्वात पहिले बीएस 6 (पातळी 2) ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईप वाहन ठरले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Spread the love

One Comment on “जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे उद्घाटन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *