The wildlife treatment centre at Bavdhan started
बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू
पुणे : वन्य प्राण्यांचे स्थलांतर, देखभाल, उपचार नियोजनाची व्यवस्था व इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्राच्या कामास प्रत्यक्षात सूरूवात झाल्याची माहिती वन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
देखभाल व उपचार नियोजनासाठी वन्यप्राणी या विषयात तज्ज्ञ असणाऱ्या ३ संस्थांनी मुख्य वन संरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीसमोर सादरीकरण केले. समितीने दिलेल्या गुणांच्या अनुषंगाने रेस्क्यू (आरइएसक्यू) धर्मादाय ट्रस्ट, पूणे या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्राची देखभाल व उपचार नियोजन व्यवस्था करण्याकरिता संस्थेसोबत करार करून केंद्राचे हस्तांतरण करण्यात आले आहे.
संस्थेचे प्रतिनिधी, वनविभागाचे कर्मचारी व वास्तू सल्लागार यांनी सामाईक पाहणी करून वन्यप्राणी उपचार केंद्र वन्य प्राण्यांचे स्थलांतर करण्याकरिता काही बाबींची पूर्तता आवश्यक असल्याचे कळविले होते. त्यानुसार आवश्यक बाबींची पुर्तता करून ७ सप्टेंबरपासून वन्यप्राणी उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एकूण १३८ वन्यप्राणी व पक्ष्यांवर याठिकाणी उपचार सुरु आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे वन्यप्राणी उपचार केंद्र असून जखमी अथवा मानवी वस्तीत वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी वन विभागाच्या १९२६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी केले आहे.
‘
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू”