गणेशोत्सव मंडळांना बॅनरद्वारे निवडणूक विषयक जनजागृती करण्याचे आवाहन

Election Commision of India

An appeal to public Ganeshotsav mandals to create awareness about elections through banners

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बॅनरद्वारे निवडणूक विषयक जनजागृती करण्याचे आवाहन

पुणे : आगामी काळात मतदारांनी मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये व निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याच्यादृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कापडी फलकाद्वारे निवडणूक विषयक जनजागृती करण्याचे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.Election Commission of India हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

भारत निवडणूक आयोगाने स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. नागरिकांचा मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये व निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी वाढावा, मतदारांना नीतिमूल्यांच्या आधारे मतदानाचे (इथिकल वोटिंग) महत्व पटवून देण्याच्यादृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत नवनवीन संकल्पना राबविण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये गणेशमंडळाच्या सहभागाने स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात येणार आहे. मतदानाच्या टक्केवारीत वृद्धी आणि लोकशाही सक्षमीकरणासाठी सातत्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निवडणूक प्रशासनाचा प्रयत्न आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडून या वर्षी गणेशोत्सवामध्ये संदेश देणाऱ्या फलकाद्वारे निवडणूक विषयक जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना सजावटीद्वारे ‘मताधिकार बजावण्यासाठी मतदार नोंदणी’. ‘मताधिकार’, ‘लोकशाहीचे सक्षमीकरण’ आदी विषयांचे बॅनर लावता येईल.

गणेशोत्सव मंडळांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वय अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
मिठाई विक्रेते व नागरिक यांना काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
Spread the love

One Comment on “गणेशोत्सव मंडळांना बॅनरद्वारे निवडणूक विषयक जनजागृती करण्याचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *