Establishment of Sadhana Career Club and inauguration of Career Corner in Sadhana Vidyalaya
साधना विद्यालयात साधना करिअर क्लब स्थापना आणि करिअर कॉर्नरचे उद्घाटन
सातत्य,निष्ठा,आणि प्रयत्नांची जोड यामुळे करिअर गाठता येते: डाॅ.शंतनू जगदाळे
हडपसर : जीवनात आपले करिअर पूर्ण करत असताना जिद्द,सातत्य,व प्रयत्नांची जोड आवश्यक असते. ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच सुरूवात करावी. सातत्य राखावे. तर नक्कीच आपण करिअर,ध्येय पूर्ण करू शकतो. असे प्रतिपादन आयर्नमॅन डाॅ.शंतनू जगदाळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय हडपसर येथे साधना करिअर क्लब स्थापना तसेच करिअर कॉर्नरचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , आयर्नमॅन डॉ.शंतनू जगदाळे ,आयर्नमॅन डॉ.योगेश सातव यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.शंतनू जगदाळे बोलत होते.
आयर्नमॅन डाॅ.योगेश सातव यांनी आयर्नमॅन कसे बनता येते व आरोग्यविषयक माहिती सांगितली. यावेळी समुपदेशक रवींद्र भोसले यांनी साधना करिअर क्लब याविषयी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच करिअर क्लब स्थापनेचा उद्देश सांगितला.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम , पर्यवेक्षक शिवाजी मोहिते ,माधुरी राऊत , ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर,धनाजी सावंत ,समुपदेशक शीला गंधट,नितीन जगदाळे,रूपाली सोनावळे, दिपाली गावंडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन रुपाली सोनावळे यांनी केले तर आभार शीला यांनी मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “साधना विद्यालयात साधना करिअर क्लब स्थापना आणि करिअर कॉर्नरचे उद्घाटन”