आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Department of Public Health Maharashtra State सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The deadline for submission of applications for Health Department Recruitment extended to September 22

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी 29 ऑगस्ट 2023 पासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 22 सप्टेंबर 2023 रोजी रात्रौ 11.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.ublic Health Division, Govt. Of Maharashtra. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पण 22 सप्टेंबर रोजी रात्रौ 11.55 वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही आयुक्त आरोग्य सेवा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲप चॅनलवर!
Spread the love

One Comment on “आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *