इंडियन ऑईलकडून भारतभरात सर्वत्र नवीन एलपीजी जोडणीसाठी मिस्ड कॉल सुविधेचा प्रारंभ.

Indane LPG

नवीन इंडेन एलपीजी कनेक्शन हवे आहे का? त्यासाठी केवळ 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.

इंडियन ऑईलकडून भारतभरात सर्वत्र नवीन एलपीजी जोडणीसाठी मिस्ड कॉल सुविधेचा प्रारंभ.

सध्याच्या ग्राहकांना सिलेंडर मागवण्यासाठी देखील नोंदणीकृत फोन क्रमांकावरून मिस्ड कॉल देऊन मागणी नोंदवता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या दृष्टीकोनाला अनुसरून इंडियन ऑईलने सर्व ग्राहकांसाठी मिस्ड कॉल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशभरातील संभाव्य ग्राहक नवीन एलपीजी जोडणी घेण्यासाठी आता  8454955555 या नंबरवर मिस्ड कॉल देऊ शकतात. व्यापक स्तरावर ग्राहक संपर्क असणाऱ्या आमच्या कंपनीचा प्रयत्न  हा संपर्क जास्तीत जास्त वाढवण्याकडे आहे, असे इंडियन ऑइलचे अध्यक्ष एस एम वैद्य यांनी देशभरातील ग्राहकांसाठी या सुविधेचा प्रारंभ करताना सांगितले.

Indane LPG
इंडेन एलपीजी कनेक्शन

“अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आम्ही आमच्या ग्राहकांना सातत्याने नवनवीन सुविधा देत असतो.  ग्राहकांना एलपीजी त्वरित आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासंदर्भात ही मिस्ड कॉल सुविधा योग्य भूमिका बजावेल आणि ग्राहकांच्या समाधानास पात्र ठरेल याची मला मला संपूर्ण खात्री आहे”, असेही वैद्य यांनी नमूद केले

ग्राहकांना  एलपीजीचा रिफिल सिंलेडर मागवण्यासाठी किंवा एलपीजीच्या किमतीचा भरणा करण्यासाठी भारत बिल पेमेंट सिस्टीम, इंडियन ऑइल वन अॅप किंवा https://cx.indianoil.in ज्या पोर्टलचा वापर करता येईल.

एलपीजी रिफिल सिलेंडर नोंदवणे तसेच रिफिलसाठी किमतीचा भरणा करणे या दोन्ही गोष्टी 7588888824 या  नंबर वरून   व्हाट्सअप करुन किंवा 7718955555 या नंबरवर एसएमएस /आयव्हीआरएस माध्यमातून करू शकतील शकतात. याशिवाय  ॲमेझॉनचे अलेक्सा  किंवा  पेटीएम चॅनेल्सवरूनही ही कामे करता येतील.

“रिफिल नोंदवण्यासाठी देशभरातून कुठूनही मिस्ड कॉल देण्याची सुविधा आणि निवडक ठिकाणी नवीन जोडणीसाठी मिस्ड कॉल सुविधा  जानेवारी 2021 मध्ये सुरू केली होती.”

वापरास सुलभ असणारी मिस्ड कॉल सुविधा ग्राहकांचा वेळ वाचवेल. तसेच नवीन ग्राहकांना जोडणीसाठी असलेली मिस्डकॉलची सुविधा ही सोपी व विनाखर्चाची असल्याने ग्राहकांना विशेषतः वरिष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी ती जास्त उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा अध्यक्षांनी  व्यक्त केली.

डबल बॉटल कनेक्शन (DBC) ही आणखी एक सुविधा ग्राहकांना घरपोच देण्याच्या उपक्रमाचेही एस एम वैद्य यांनी या वेळी उद्घाटन केले. या योजनेअंतर्गत सिलेंडर देणारा कर्मचारी, सध्याचे एक सिलेंडर हे डबल बॉटल कनेक्शन म्हणजे दोन सिलेंडर मध्ये परावर्तित करण्याची सुविधा घरपोच देऊ शकेल. यामध्ये  सामान्यतः 14.2 किलोग्रॅम एवढ्या सिलेंडर बरोबर पाच किलोग्रामचा सिलेंडर मिळेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *