देशाच्या हरित क्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांचं निधन

Dr M. S. Swaminathan, the father of the green revolution of the country, passed away देशाच्या हरित क्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांचं निधन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Dr M. S. Swaminathan, the father of the green revolution of the country, passed away

देशाच्या हरित क्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांचं निधन

डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक केला व्यक्त Dr M. S. Swaminathan, the father of the green revolution of the country, passed away
देशाच्या हरित क्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांचं निधन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

चेन्नई : देशातल्या हरित क्रांतीचे जनक आणि ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक डॉ एम एस स्वामिनाथन यांचं आज चेन्नई इथे वार्धक्यानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. १९६० च्या दशकात भारताला दुष्काळासारख्या परिस्थितीतून सोडवण्यासाठी स्वामीनाथन यांनी त्यांच्या धोरणांद्वारे सामाजिक क्रांती घडवून आणली. त्यांनी एमएस स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली आणि गव्हाच्या उच्च-उत्पादनाच्या जातीचे बियाणे विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे भारतात हरित क्रांती झाली.

स्वामीनाथन यांना 1986 मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार, 1987 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्कार, 1991 मध्ये पर्यावरणविषयक कामगिरीसाठी टायलर पुरस्कार आणि प्लॅनेटसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत आणि 2000 मध्ये इंटरनॅशनल जिओग्राफिकल युनियनचे मानवता पदक लाभले होते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संघटनांमधली अनेक पदंही त्यांनी भूषवली होती.

डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटले की, ते एक दूरदर्शी होते ज्यांनी अन्न सुरक्षा मिळवण्यासाठी अविरतपणे काम केले आणि त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हटले गेले. राष्ट्रपती म्हणाले की त्यांनी भारतीय कृषी विज्ञानाचा समृद्ध वारसा सोडला आहे जो मानवतेच्या सुरक्षित आणि भूकमुक्त भविष्याकडे जगाला दिशादर्शक प्रकाश म्हणून काम करू शकेल.

आपल्या संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की, डॉ. एमएस स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यामुळे भारताच्या इतिहासातील अत्यंत गंभीर काळात लाखो लोकांचे जीवन बदलले आणि देशासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी डॉ एमएस स्वामीनाथन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आणि त्यांना देशातील हरित क्रांतीमागील दूरदर्शी व्यक्ती म्हटले. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, श्री ठाकूर म्हणाले की त्यांच्या प्रयत्नांमुळे भारत अन्न उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण देश बनला.

स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा, कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा तसेच शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारतमातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, भारताची कृषी क्षेत्रातील, मृद व जलसंधारण क्षेत्रातील प्रगती ही डॉ. स्वामीनाथन यांच्या अखंड साधनेचे फलित आहे. त्यांच्या संशोधनाच्या आधारावर भारताने अन्नधान्य स्वयंपूर्णता प्राप्त केली.  डॉ. स्वामीनाथन यांनी शेतमजूर, शेतकरी ते कार्पोरेट फार्मिंग याविषयी त्यांनी मांडणी केली. भारतीय हरितक्रांतीचे जनक हे बिरूद त्यांनी अखंडपणे एक व्रत म्हणून सांभाळले. जागतिक स्तरावर डॉ. स्वामीनाथन ही आपल्या भारतीयांची एक महान बौद्धिक संपदा म्हणून पाहिले जात होते. अशा या भारत मातेच्या महान सुपुत्राचे निधन देशाचे मोठे नुकसान आहे.

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला

भारताच्या हरित क्रांतीचे जनक ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाने भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत संशोधन पोहोचविणारा, भारताच्या हरितक्रांतीचा जनक हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

भारताला अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ.  एम. एस. स्वामिनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या कपाळावरचा अन्न-धान्य टंचाईचा कलंक पुसून देशातील गरीब शेतकऱ्यांना संकरित बियाण्यांच्या माध्यमातून अधिक उत्पादनाचा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या निधनाने देशाच्या पहिल्या हरितक्रांतीचा जनक हरपला आहे, अशा शोकभावना व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण डॉ.  एम. एस. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची प्रचंड हानी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त

सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ तथा स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनामुळे कृषी क्षेत्राची प्रचंड हानी झाली असल्याची खंत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त करत डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?
Spread the love

One Comment on “देशाच्या हरित क्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांचं निधन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *