पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये २६ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा केला शुभारंभ

Prime Minister Narendra Modi

Prime Minister Narendra Modi launched development projects worth Rs 26 thousand crores in Chhattisgarh

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये २६ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा केला शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माँ दंतेश्वरी मंदिरात जाऊन देवीचे घेतले दर्शन

Prime Minister Narendra Modi
File Photo

जगदलपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. आदिवासी बस्तर विभागाचं विभागीय मुख्यालय असलेल्या जगदलपूर इथं त्यांनी २६ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. तसंच बस्तरमध्ये नागरनार इथल्या एनएमडीसीच्या ग्रीनफिल्ड पोलाद प्रकल्पाचं त्यांनी लोकार्पण केलं. जवळजवळ २४ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामध्ये उच्च गुणवत्तेचं पोलाद उत्पादन होईल. या प्रकल्पामुळे हजारो जणांना रोजगार मिळेल.

आपल्या जगदलपूर भेटीत प्रधानमंत्र्यांनी जगदलपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली तसंच अंतागड आणि तारोकी दरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग आणि जगदलपूर आणि दंतेवाडा दरम्यानच्या दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पाचं लोकार्पण केलं.

तारोकी आणि रायपूर दरम्यानच्या रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला या प्रकल्पांमुळे या आदिवासी भागातला रेल्वे संपर्क सुधारेल आणि या भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४५ वर कुंकुरी आणि छत्तीसगड-झारखंड सीमेदरम्यान बांधलेल्या नवीन मार्गाचं देखील प्रधानमंत्री मोदी यांनी आज लोकार्पण केलं.

पंतप्रधानांनी,छत्तीसगडमधील बस्तर येथील माँ दंतेश्वरी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन केली पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधील बस्तर येथील माँ दंतेश्वरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले आणि पूजा केली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले,

 

बस्तरमधील माता दंतेश्वरीच्या मंदिरात जाऊन तिची पूजा-अर्चना करून आशीर्वाद घेतला. छत्तीसगढमधील सर्व नागरिकांच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.”

 

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
ॲट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा
Spread the love

One Comment on “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये २६ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा केला शुभारंभ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *