तरुणांनी कौशल्य विकसित करीत स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे

Minister Mangalprabhat Lodha मंत्री मंगलप्रभात लोढा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Youths should prioritize self-employment by developing skills

तरुणांनी कौशल्य विकसित करीत स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे

– मंत्री मंगल प्रभात लोढा

‘महाराष्ट्र स्टार्टअप ॲक्सलरेशन’ कार्यक्रमाचा समारोप

Minister Mangalprabhat Lodha मंत्री मंगलप्रभात लोढा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News
File Photo

मुंबई : देशातील तरुणांनी स्वत:मधील कौशल्य विकसित करावे. तसेच स्वयंरोजगार करताना अन्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे केले.

महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटी व अर्थ स्कूल ऑफ इंटरप्रीनरशीप यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी महाराष्ट्र स्टार्टअप ॲक्सलरेशन समारोप कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., अर्थ स्कूल ऑफ इंटरप्रीनरशीपचे संस्थापक हरी टी.एन.,राज्य नाविन्यता सोसायटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शिंदे होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, व्यवसाय निवडताना आपल्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर करावे. मात्र, ते करताना सुरुवातीच्या काळात नफा किंवा तोट्याचा विचार न करता सातत्य महत्त्वाचे आहे. भविष्याचा वेध घेऊन रोजगार सुरू केल्यावर आवश्यक तेथे त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी. आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षण घ्यावे. यावेळी आयुक्त डॉ. रामास्वामी, ‘अर्थ’चे संस्थापक श्री. हरी यांनी मार्गदर्शन केले.

‘महाराष्ट्र स्टार्टअप ॲक्सलरेशन कार्यक्रम‘

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने अर्थ स्कूल ऑफ इंटरप्रीनरशीपच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सलरेशन कार्यक्रम’ सुरु केला आहे. या कार्यक्रमात ४ दिवस व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या संस्थापक आणि तज्ञाद्वारे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष स्वरूपात समस्या सोडविण्याचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत (दि. ५ ते ८ ऑक्टोबर, २०२३), पुणे (दि. १३-१६ डिसेंबर, २०२३) आणि नागपूर (दि. २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४) या तीन शहरांमध्ये हे सत्र आयोजित केले जातील. प्राथमिक टप्प्यातील स्टार्ट अपच्या संस्थापकांना स्केलिंगच्या सामान्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी माहिती देणे आणि साधने प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

स्टार्टअप ॲक्सलरेशन कार्यक्रम हा एक निश्चित कालावधी, ठराविक समूहासाठी आयोजित कार्यक्रम आहे. जो स्टार्टअपना सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप वाढण्यास आणि यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी मार्गदर्शन करतो. हे कार्यक्रम सामान्यतः ॲक्सलरेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थांद्वारे चालवले जातात. ते स्टार्टअप्सना त्यांचे व्यवसाय मॉडेल तयार करण्यात, सर्वोपयोगी उत्पादने तयार करण्यात आणि त्यांच्या वाढीला गती देण्यासाठी संसाधने (सोर्स) मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध करून देतात.

ॲक्सलरेशन कार्यक्रम स्टार्टअप्सना त्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत करण्यासाठी तयार केलेले आहेत. ते सामान्यतः अशा स्टार्टअप्ससह काम करतात जे विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि नवीन उत्पादन किंवा सेवेवर काम करत आहेत. हे कार्यक्रम स्टार्टअप्सना त्यांच्या व्यवसायाची कल्पना प्रमाणित करण्यात, त्यांचे उत्पादन किंवा सेवा तयार करण्यात आणि ग्राहक मिळविण्यात मदत करतात. हे स्टार्टअप्सना त्यांचे व्यवसाय गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी देते. मार्गदर्शन, नेटवर्क, पायाभूत सुविधा, निधी यासह अनेक पैलूंवरील स्टार्टअप्सना चालना देईल.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
Spread the love

One Comment on “तरुणांनी कौशल्य विकसित करीत स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *