An inquiry committee has been formed in the case of narcotics in Sassoon General Hospital
ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थ प्रकरणी चौकशी समिती गठित – मंत्री हसन मुश्रीफ
अहवाल १५ दिवसांत शासनास सादर करण्याच्या सूचना
मुंबई : ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली पदार्थ प्रकरण व त्यासंबंधित घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्याकरिता चौकशी समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली पदार्थ प्रकरण चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे अध्यक्ष असून सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. हेमंत गोडबोले, मुंबई ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार हे सदस्य म्हणून काम पाहतील.
या समितीने सखोल चौकशी करून आपला सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थ प्रकरणी चौकशी समिती गठित”