सर्व शासकीय कार्यालयात ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याच्या प्रशासनाच्या सूचना

Swacha-Bharat-Abhiyan स्वच्छ भारत मिशन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Administration instructions to implement a cleanliness campaign in all government offices till 31st October

सर्व शासकीय कार्यालयात ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याच्या प्रशासनाच्या सूचना

पुणे : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय स्वच्छ, सुंदर व नीटनेटके करण्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयात ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.Swacha-Bharat-Abhiyan स्वच्छ भारत मिशन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

स्वच्छता अभियान राबविण्याबाबत दूरदृष्यप्रणाणीद्वारे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्याल, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद आदी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती कदम म्हणाल्या, कार्यालयातील वातावरण स्वच्छ असल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा प्रशासनास तसेच नागरिकांला लाभ होतो. पर्यायाने प्रशासन उत्तरदायी, सुलभ, पारदर्शी आणि गतिमान होण्यास मदत होते. याचा विचार करता कार्यालयीन स्वच्छता अभियान राबविण्याची कार्यवाही करावी.

कार्यालयीन वस्तू, दस्तऐवज, कपाटे सुस्थितीत ठेवावेत. कार्यालयांच्या इमारतीच्या भिंतींचे रंगरंगोटीचे काम करुन घ्यावे. स्वच्छतागृहांचे दरवाजे, कडी-कोयंडा, आवश्यक विद्युत तारांची दुरुस्ती करून घ्यावी. प्रसाधनगृह, स्वच्छतागृहांची वारंवार स्वच्छता करावी. बगीच्यातील हिरवळीची नीट कापणी करुन घ्यावी.

कार्यालयातील मोडके फर्निचर, रद्दी आदींची नियमानुसार विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करावी. टेबलाच्या आजूबाजूला कागदांचे ढिग, नस्तींचा गठ्ठा, सुटे कागद, अनावश्यक प्लॉस्टिक बाटल्या, चहाचे कप आदी ठेवू नयेत. अभ्यागतांसाठी स्वतंत्र बैठक कक्ष तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. महिलांसाठी हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

कार्यालयीन अभिलेख किंवा दस्तावेज सुस्थितीत लावून घ्यावेत. अभिलेखांचे अ, ब, क, ड वर्गीकरण करुन कालबाह्य अभिलेखे नियमानुसार नष्ट करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना श्रीमती कदम यांनी दिल्या.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
प्रत्येकाचा एव्हरेस्ट वेगळा असतो – एव्हरेस्टवीर अपर्णा प्रभुदेसाई
Spread the love

One Comment on “सर्व शासकीय कार्यालयात ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याच्या प्रशासनाच्या सूचना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *