शिक्षण विभागाच्या प्रलंबित विषयांबाबत आढावा बैठक संपन्न.

School Education Omprakash alias Bachchu Kadu

शिक्षण विभागाच्या प्रलंबित विषयांबाबत आढावा बैठक संपन्न.

शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. 

School Education Omprakash alias Bachchu Kadu
शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाच्या प्रलंबित विषयांच्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार राजकुमार पटेल, प्रभारी शिक्षण आयुक्त राहुल द्विवेदी, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, माध्यमिकच्या शिक्षण उपसंचालक वंदना वाहुळ, प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदचे शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोडे, उपायुक्त हरुण अत्तार, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले, यांच्यासमवेत संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत; अंशत: अनुदानित शाळा व तुकडीवरील अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देणे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत. त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदाची मागणी कोणत्याही संस्थेकडून नसल्यामुळे तूर्त समायोजन प्रक्रिया थांबविणे. शालेय शिक्षण विभाग निर्णय ११ डिसे २०२० चतुर्थ श्रेणी कर्मचारी नोकर कपाती बाबतचा शासन निर्णय रद्द करणे. शासन निर्णय २ मार्च २०१९ नुसार सुधारीत आश्वासित त्रिस्तरीय प्रगती योजना १०-२०-३० चा लाभ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत लागू करण्याबाबत सद्यस्थिती. विना अनुदानित शाळा किंवा तुकडीवरील शिक्षक भरती करिता पवित्र पोर्टल प्रणालीतून सूट देणे. राज्यातील शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवडश्रेणी लागु करणेबाबत शासन निर्णय २० जुलै २०२१ मधील मुद्दा क्र.४ मधील संदिग्धता दूर करणे. तसेच प्रशिक्षण तात्काळ आयोजीत करण्याबाबत. (शारीरिक शिक्षकांचा सामान्य शिक्षक संवर्ग समजून निवड श्रेणीचा लाभ देणे).राज्यातील सर्व शिक्षकांचे पगार सी.एम.पी प्रणाली द्वारे करणे. इत्यादी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *