Inauguration of the website ‘Kasturi Cotton Bharat’
‘कस्तूरी कॉटन भारत’ या संकेतस्थळाचे उद्घाटन
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘कस्तूरी कॉटन भारत’ या संकेतस्थळाचे उद्घाटन
नवी दिल्ली : केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज कस्तूरी कॉटन भारत या कापसाच्या ब्रॅंडच्या विशेष संकेतस्थळाचे https://kasturicotton.texprocil.org उद्घाटन केले. या संकेतस्थळावर, या उप्रकमाविषयीची सगळी महत्वाची आणि अद्ययावत माहिती मिळू शकेल. त्याशिवाय, जिनिंग व्यावसायिकांसाठीची कस्तूरी कापूस उत्पादन विषयक नोंदणी प्रक्रिया आणि या कापसाला विशेष भारतीय ब्रॅंड बनवणाऱ्या इतर सर्व प्रक्रियांची माहिती मिळू शकेल.
कस्तूरी कॉटन भारत, हा, वस्त्रोद्योग मंत्रालय, भारतीय कापूस महामंडळ, व्यापार संस्था आणि उद्योग यांचा एक संयुक्त उपक्रम आहे, जो जागतिक बाजारपेठेत भारतीय कापसाची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व भागधारकांसाठी शाश्वत व्यवस्था तयार करण्यासाठी ब्रँडिंग, व्यावसायिक माग घेणे आणि भारतीय कापसाच्या प्रमाणीकरणाची जबाबदारी घेऊन स्वयं-नियमनाच्या तत्त्वावर काम करतो.
याआधी, 7 ऑक्टोबर रोजी, जागतिक कापूस दिनाच्या पूर्वसंध्येला, वस्त्रोद्योग मंत्रालयाने “कस्तुरी कॉटन ब्रॅंड” ह्या भारतीय कापसाच्या विशेष ब्रॅंडची घोषणा केली होती. यासाठी एक विशेष लोगो देखील प्रसिद्ध करण्यात आला असून, हा लोगो, कस्तुरी कापसाची वैशिष्ट्ये, त्याची शुभ्रता, मुलायम पोत, त्याची शुद्धता, चमक आणि भारतीयत्व व्यक्त करतो. त्यानंतर, केंद्र सरकारच्या वतीने सीसीआय आणि वस्त्रोद्योग उद्योगांच्या टेक्सोप्रोकिल (TEXPROCIL) यांच्यात, 15 डिसेंबर 2022 रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला. ज्याद्वारे, कस्तुरी कॉटन भारत ब्रॅंड चे विशेष स्थान निर्माण करण्यासाठी मिशन मोड वर काम करण्याचा दृष्टीकोन निश्चित करण्यात आला.
देशातील सर्व विक्रेत्यांना, निश्चित प्रोटोकॉलनुसार कस्तुरी कॉटन भारत ब्रँडचे उत्पादन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याशिवाय, संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये कस्तुरी कॉटन भारतची संपूर्ण साखळी प्रदान करण्यासाठी, प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर QR आधारित प्रमाणपत्र तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि ब्लॉकचेन आधारित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, एंड टू एंड ट्रेसेबिलिटी म्हणजे उत्पादनाचा, सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा प्रवास, आणि व्यवहार प्रमाणपत्र प्रदान करेल.
“कस्तुरी कॉटन भारत उपक्रमाद्वारे आम्ही केवळ एक ब्रँड सुरू करत नाही, तर भारताचा समृद्ध वारसा जगासमोर आणत आहोत. आपल्या भूतकाळाशी धागे जोडणारा एक भविष्यकाळ आपण घडवूया, ” असे वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यावेळी म्हणाले. जागतिक स्पर्धेच्या युगात, हा उपक्रम भारतीय कापसाला त्याच्या गुणवत्ता मानकांमुळे आणि सर्वोत्तम पद्धतींप्रतीच्या वचनबद्धतेमुळे जागतिक नकाशावर महत्वाचे स्थान मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com