Railways announced 283 special services for smooth and comfortable journeys for passengers
सणासुदीच्या काळात प्रवाशांचा सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून 283 विशेष सेवा घोषित
283 विशेष सेवांच्या माध्यमातून 4480 फेऱ्या
प्रमुख स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनाला प्राधान्य
देशभरातील प्रमुख ठिकाणे रेल्वे मार्गांवर जोडण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन
नवी दिल्ली : सध्या सुरु असलेल्या सणासुदीच्या काळात, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे यावर्षी छठ पूजेपर्यंत 283 विशेष गाड्यांच्या 4480 फेऱ्या चालवत आहे.
देशभरातील प्रमुख स्थळांना रेल्वे मार्गांवर जोडण्यासाठी दिल्ली- पाटणा, दिल्ली-श्री माता वैष्णोदेवी कटरा, दानापूर-सहरसा, दानापूर- बंगळुरू, अंबाला-सहरसा, मुझफ्फरपूर-यशवंतपूर, पुरी-पाटणा, ओखा-नाहरलगुन, सियालदह-न्यू जलपाईगुडी, कोचुवेली-बेंगळुरू-मुंबई, हावडा-रक्सौल इ. विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 2022 या वर्षात भारतीय रेल्वेने 216 पूजा विशेष गाड्यांच्या 2614 फेऱ्या घोषित केल्या होत्या.
अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांचा सुव्यवस्थित प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी रांगा लावणे यांसारखे आरपीएफ कर्मचार्यांच्या देखरेखीखाली टर्मिनस स्थानकांवर गर्दी नियंत्रित करण्याचे उपाय हाती घेण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. गाड्या सुरळीत चालाव्यात यासाठी प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन कर्तव्यावर अधिकारी तैनात केले जातात, रेल्वे सेवेत कोणताही व्यत्यय आल्यास प्राधान्याने उपस्थित राहण्यासाठी विविध विभागांमध्ये कर्मचारी तैनात केले जातात.
फलाट क्रमांकासह गाड्यांच्या आगमन/निर्गमनाची वारंवार आणि वेळेवर घोषणा करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या स्थानकांवर “मे आय हेल्प यू” कक्ष कार्यरत ठेवले जातात तिथे प्रवाशांच्या योग्य सहाय्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी आरपीएफ कर्मचारी आणि टीटीई नियुक्त केले जातात.कॉलवर प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय पथके उपलब्ध आहेत.निमवैद्यकीय पथकासह रुग्णवाहिकाही उपलब्ध आहे.
सुरक्षा आणि दक्षता विभागाच्या कर्मचार्यांकडून कोणत्याही गैरप्रकारावर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे. सर्वसाधारणपणे प्रतिक्षालय, रेल्वेस्थानकावर थांबण्यासाठी रिटायरिंग रूम, फलाट आणि स्थानकांवर स्वच्छता राखण्याच्या सूचना विभागीय मुख्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “प्रवाशांचा सुरळीत आणि आरामदायी प्रवासाठी रेल्वेकडून 283 विशेष सेवा घोषित”