Women should also take care of their own health: Dr Anuradha Jadhav
महिलांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी : डाॅ अनुराधा जाधव
हडपसर : साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्युनियर कॉलेज हडपसर येथे माता – पालक संघाच्या वतीने माता- पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ.अनुराधा जाधव यांनी महिलांना मार्गदर्शन केले.मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, धावपळीच्या युगात स्त्रियांचे स्वतः कडे दुर्लक्ष होत आहे .त्यात सद्या वाढत असलेले कॅन्सरचे प्रमाण , अॅनिमिया, पीसीओडी , मेनोपॉस या समस्या जोर धरत आहेत .यासाठी सकस आहार, व्यायाम आणि वेळोवेळी डॉ.योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे .कारण ही काळाची गरज आहे.घरातील स्त्री जर निरोगी असेल तर ती कुटुंब छान सांभाळू शकते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य दत्तात्रय जाधव मार्गदर्शन करताना म्हणाले ,घरातील नियोजनाची पूर्ण जबाबदारी ही स्त्रियांकडे असते .स्त्री हा कुटुंबाचा कणा असते त्यामुळे ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते .
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षिका माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सोनाली गायकवाड, सचिव रूपाली सोनावळे,सहसचिव स्वाती ढाकणे,बहुसंख्य माता-पालक ,महिला शिक्षिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका माधुरी राऊत यांनी केले.सूत्रसंचालन पल्लवी कुंभार व सविता पाषाणकर यांनी केलेतर आभार रश्मी गुजर यांनी मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “महिलांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी”