15th Annual Conference of Startup Incubators organized in Mumbai from 26th to 28th October
स्टार्टअप इनक्यूबेटर्सच्या १५ व्या वार्षिक परिषदेचे मुंबईत २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
मुंबई : देशातील स्टार्टअप इन्क्यूबेटरची अग्रणी संस्था असलेल्या इस्बा – (ISBA इंडियन स्टेप अॅण्ड बिझनेस इनक्यूबेटर असोसिएशन) या संस्थेच्या इस्बाकॉन २०२३ (ISBACON2023) या १५ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन मुंबई येथे २६ ते २८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणार असून, या कार्यक्रमासाठी देशभरातील २०० पेक्षा अधिक स्टार्टअप्स इन्क्यूबेटर्सचे प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन २७ ऑक्टोबर रोजी आयटीसी (ITC) ग्रॅण्ड सेंट्रल, परळ, मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.
‘इस्बा’ची वार्षिक परिषद ही भारतातील स्टार्टअप इनक्यूबेटर्सची सर्वात मोठी सभा आहे. यात गुंतवणूकदार, सरकारी प्रतिनिधी, तज्ञ सहभागी होतात. स्टार्टअप्स इकोसिस्टिम करीता महत्वाच्या असलेल्या या परिषदेचे मुंबईमध्ये प्रथमच आयोजन होत असून, ही परिषद महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या (Maharashtra State Innovation Society ) सहकार्याने होणार असून या कार्यक्रमाची सुरुवात 26 ऑक्टोबर रोजी महत्वच्या विषयावर प्री-कॉन्फरन्स कार्यशाळेने होईल. त्यानंतर 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांत १७ परिषद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. 26 ऑक्टोबर रोजी परिषदपूर्व कार्यशाळा होईल. यामध्ये 1. उत्पादक इनक्यूबेटर व्यवस्थापन 2. सीड फंड /गुंतवणूक व्यवस्थापन 3. प्रदीप युवराज यांचे लीडर्ससाठी व्यवसाय कथाकथन या सत्रांचा समावेश असेल. तर मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन २७ ऑक्टोबर रोजी आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल, मुंबई येथे होणार असून, या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रित केले आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. लोढा, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामस्वामी एन., उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह प्रमुख अतिथी असतील. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम होईल.
दोन दिवसीय परिषदेमध्ये 27 ऑक्टोबरला पुढील विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
आयडिया ते आयपीओ- प्रवास,बिझनेस इनक्यूबेशनची कल्पना करणे- बदलत्या काळाशी संबंधित राहणे, समावेशकता आणि टिकाऊपणाच्या संदर्भात इन्क्यूबेशनमधील संधी, ग्राउंड झिरो आणि क्लस्टर उपक्रमांवर राज्य स्टार्टअप मिशन-योगदानावर सत्र, पॉवर कनेक्ट – सांची कनेक्ट, क्लस्टर उपक्रमांद्वारे इन्क्यूबेशन क्षमता वाढवणे, बायोटेक स्टार्टअपसाठी निधी सक्षम करण्यासाठी बायोटेक इनक्यूबेटर माध्यमातून सर्जनशील उपाय,बिझनेस इनक्यूबेटरच्या चांगल्या पद्धती, अद्वितीय इन्क्यूबेशन कार्यक्रमाचे अनुभव या विषयी चर्चासत्र होणार आहेत तर 28 ऑक्टोबर रोजी नेतृत्व गुण कसे विकसित करावे, डीप टेक इनक्यूबेशन-संधी आणि आव्हाने, सीएसआरच्या पलीकडे कॉर्पोरेट / संलग्नता, भारतीय स्टार्टअप्स आणि इनक्यूबेटर्ससाठी संरक्षण क्षेत्रातील संधी, इनक्यूबेटर-इंडस्ट्री कनेक्ट, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाकडून स्टार्टअप्स / इनक्यूबेटर्ससाठी पुढाकार. या महत्त्वाच्या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून स्टार्टअप्स इकोसिस्टिम करिता कॅपसीटी बिल्डिंग प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला आहे.
संपूर्ण कार्यक्रम तपशील आणि नोंदणीसाठी, विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.isbacon.in वर भेट द्यावी, असे आवाहन इस्बा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “स्टार्टअप इनक्यूबेटर्सच्या १५ व्या वार्षिक परिषदेचे मुंबईत २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजन”