सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहंस्तातरण करुन घ्यावे
– मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे
पुणे : सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहंस्तातरण करुन घ्यावे, असे आवाहन गृहनिर्माण सहकारी संस्था पदाधिकारी, संचालक व सभासदासांठी आयोजित कार्यशाळेच्याप्रसंगी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि पुणे व पिंपरी-चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पी. टी. घुगे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मुख्याधिकारी एस. एस. बोडके, सहकार अधिकारी श्रेणी १ विशाल दाते, मुख्याधिकारी एम. एल. सरवदे, एम. डी. भोईर, उपमुख्याधिकारी एस. डी. आगरकर, सहकार शिक्षणाधिकारी युवराज भोसले, अजय जाधव, व्याख्याते के. उदय शंकर आदी उपस्थित होते.
श्री. गटणे म्हणाले, सहकारी गृहनिर्माण संस्थांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. संस्थेच्या इमारतीचा विमा काढून घ्यावा जेणेकरुन नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत होईल. संस्थेच्या इमारतीचे फायर ऑडीट तसेच ३० वर्षाच्या पुढील इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावेत.
संस्थेच्या जागेचे हस्तांतरण झाल्यानंतर त्याची नोंद प्रॉपर्टी कार्डवर झाल्याची खात्री करुन घ्यावी. देखभाल खर्चाच्या रक्कमेची संयुक्त नावाने मुदत ठेव ठेवावी. झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाअंतर्गत निर्माण झालेल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये भाडेकरू ठेवू नयेत, असेही श्री. गटणे म्हणाले.
श्री. शंकर यांनी सभासद, संचालकाचे अधिकार जबाबदाऱ्या, लेखापरीक्षण, सहकार कायदा कलम १५४ ब मधील तरतुदी, गृहनिर्माण संस्थांना लागू असणारे विविध कायदे, संस्था डीम कनव्हेन्स, इमारत पुर्नविकास स्ट्रक्चरल ऑडीट, फायर ऑडीट आदी विषयांबाबत माहिती दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहंस्तातरण करुन घ्यावे”