Sadhana Vidyalaya First in Pune city
गुणवत्ता स्तर निश्चितित साधना विद्यालय पुणे शहरात प्रथम
हडपसर : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने संपूर्ण जिल्ह्यातील शाळांचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील कामकाजाचे मूल्यांकन केले होते. त्यामध्ये ७९९ शाळा सहभागी झाल्या होत्या.
शाळांचे १० वी,१२ वी निकाल,NMMS परीक्षेचा निकाल,चित्रकला परीक्षा, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा,क्रीडास्पर्धा,सांस्कृतिक स्पर्धा, राबवलेले सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम , विद्यार्थ्यांना मिळालेले गुण असे निकष या मूल्यांकनामध्ये होते.
ह्या सर्व निकषात साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्युनियर कॉलेज पुणे जिल्ह्यात तृतीय तर पुणे शहरात प्रथम आले. संपूर्ण पुणे जिल्ह्यात साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्युनियर कॉलेजने आपली गुणवत्ता सिद्ध केली.
विद्यार्थी गुणवत्तावाढ व सर्वांगीण विकासासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, माधुरी राऊत, आजीव सेवक अनिल मेमाणे, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे, धनाजी सावंत, पांडूरंग गाडेकर या सर्वांच्या नियोजन व मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी काम करत असतात.
विद्यालयाची पुणे जिल्ह्यातील या गुणवत्ता यादीत झालेल्या निवडीबद्दल सर्वांचे रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभाग – पुणे विभागीय चेअरमन ,आमदार चेतन तुपे पाटील , रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे ,अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार , विद्यालयाचे सर्व हितचिंतक,आजी -माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “गुणवत्ता स्तर निश्चितित साधना विद्यालय पुणे शहरात प्रथम”