Bhoomipujan for beautification work at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या सभोवतालच्या परिसरातील सुशोभिकरणाच्या कामाचे मा. कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी प्र -कुलगुरु डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य आणि अधिसभा सदस्य आदी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याशेजारी हे सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार आहे. याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित महिला आणि विद्यार्थांना प्रेरणा देणारे भित्तीचित्रे तयार करण्यात येणार आहेत. तसेच पुतळ्याशेजारील बगीच्याचेही सुशोभिकरण करण्यात येणार असून बागेच्या परिसरामध्ये पदभ्रमण करण्यासाठी मार्ग तयार करून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या पुतळ्याशेजारी विविध समारंभ व कार्यक्रमांसाठी बैठकीची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी पावने दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी मा. कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन”