Will give all possible help for propagation and cultivation of art
कलासाधनेच्या प्रसार आणि जोपासनेसाठी सर्वतोपरी मदत करणार
मिलिंद तुळाणकर यांचा विशेष सन्मान आणि कलासाधनेला नमन
नामदार चंद्रकांतदादा पाटील मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंगाने प्रभावित
पुणे : नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मिलिंद तुळाणकर यांची सदिच्छा भेट घेऊन, त्यांच्या कलासाधनेला नमन करून विशेष सत्कार केला. या भेटीत मिलिंद तुळाणकर यांनी सादर केलेल्या जलतरंगांच्या रचनांमध्ये नामदार पाटील प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं. जलतरंग कलेच्या प्रसार आणि जोपासनेसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही नामदार पाटील यांनी दिली.
पुण्यातील मिलिंद तुळाणकर यांनी आपल्या जलतरंगाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या कलेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देखील प्रभावीत झाले होते. त्यामुळे मोदीजींनी नुकत्याच राजधानी दिल्लीत झालेल्या जी-२० परिषदेतही मिलिंद तुळाणकर यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली होती. विशेष म्हणजे, आपल्या वाढदिवसादिनी मिलिंद तुळाणकर यांचा विशेष गौरव केला होता.
त्यांच्या कलासाधनेला अभिवादन करण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मिलिंद तुळाणकर यांची सदिच्छा भेट घेऊन, त्यांच्या कलासाधनेची माहिती घेतली. त्यांच्या समवेत प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, भाजप चे कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी मिलिंद तुळाणकर यांनी ही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना आपल्या कलेची ओळख व्हावी, यासाठी एक रचना सादर केली. हे ऐकून नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील प्रभावीत झाले.
मिलिंदजींची कला अतिशय दुर्मिळ आणि अद्भूत आहे. त्यांची कलासाधना सर्वांनाच प्रभावित करणारी आहे. त्यामुळे याच्या प्रसारासाठी आणि जोपासनेसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “कलासाधनेच्या प्रसार आणि जोपासनेसाठी सर्वतोपरी मदत करणार”