इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

Maharashtra SSC & HSC Board हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

Class 10th and 12th Exam Schedule Announced

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व ९ विभागीय मंडळांच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक मंडळानं काल जाहीर केलं.Maharashtra SSC & HSC Board हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

फेब्रुवारी -मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिली आहे.

इयत्ता बारावीच्या सर्वसाधारण, द्विलक्षी आणि व्यवसाय अभासक्रमांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे, तर प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत परीक्षा २ ते २० फेब्रुवारी दरम्यान होतील.

इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे, तर प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आहे. दोन्ही परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती मंडळानं पत्रकाद्वारे दिली आहे.

या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी अशी सूचनाही करण्यात आली आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनदेखील महाराष्ट्र शिक्षण मंडळाने केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीतील देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 2.0

Spread the love

One Comment on “इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *