छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखत

Combined Security Services Exam संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Interview for Admission to Pre-Student

छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखत

सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण

कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार

पुणे : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी २० ते २९ नोव्हेंबर या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५५ चे आयोजन करण्यात आले आहे.Combined Security Services Exam संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.

उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी स्कीम साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे १६ नोव्हेंबर पर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी ५५ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व सोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट पुर्ण भरून सोबत घेऊन येणे.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Spread the love

One Comment on “छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *