मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

Traffic signal हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Traffic on the Pune Channel will be diverted to an alternative route to install the bridge girders on the Mumbai-Pune Expressway

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुलाचे गर्डर बसविण्यासाठी पुणे वाहिनीवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

२८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ३ वा. या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

MSRDC
.

पुणे : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या लांबीत पुणे वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते ३ वा. या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीमधून अंदाजे १ कि.मी. लांबीसाठी पुण्याच्या दिशेने प्रतिबंधित वेगाने वळविण्यात येणार आहे. तसेच याच कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सदर लांबीत नेहमीप्रमाणे मुंबईच्या दिशेने सुरु राहील. काम पूर्ण झाल्यावर दुपारी ३ वाजता मुंबईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीमधून सुरु करण्यात येईल.

या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
संविधानाच्या मूल्यांचे पालन करणे गरजेचे
Spread the love

One Comment on “मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *