केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-२०२३ ऑनलाईन घेण्यात येणार
प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-२०२३’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ५ जून,२०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-२०२३ या परीक्षेचे आयोजन जून,२०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये घेण्याचे नियोजित होते. न्यायालयात दाखल याचिका आणि प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. शासन निर्णय संकिर्ण २०२२/प्र.क्र.८१/टीएनटी-०१, दि. २७सप्टेंबर, २०२३ अन्वये सदर परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातीलसर्व जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-२०२३’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
पात्र उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर ०१ ते ०८ डिसेंबर,२०२३ रोजी २३-५९ वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या उमेदवारांनी ईमेलव्दारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे, अशा उमेदवारांची न्यायालयाच्या आदेशान्वये पडताळणी करुन त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत करण्यात येईल. तथापि सदर उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत पुनश्चः ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरणे बंधनकारक आहे याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्षांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-२०२३ ऑनलाईन घेण्यात येणार”