कोविड -19 विरुद्ध प्रभावीपणे लढण्यासाठी  14744.99 कोटी रुपये राज्यांना  जारी

Covid-19-Pixabay-Image

ECRP-II पॅकेजची अंमलबजावणी जलद गतीने.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना ईसीआरपी – II पॅकेजचा 35% चा आणखी एक  हप्ता जारी केला.

कोविड -19 विरुद्ध प्रभावीपणे लढण्यासाठी  14744.99 कोटी रुपये राज्यांना  जारी.

Covid-19-Pixabay-Image
Emergency Response & Health System Preparedness Package

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय कोविड -19 महामारीच्या व्यवस्थापनासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना मदत करत आहे. दुसरी लाट, आणि त्याचा ग्रामीण, निम -शहरी आणि आदिवासी भागात प्रसार आणि महामारीची परिस्थिती पाहता, केंद्रीय मंत्रिमंडळाने 23,123 कोटी रुपयांच्या इंडिया कोविड -19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता  पॅकेज: टप्पा – II (ईसीआरपी -II पॅकेज) ला 8 जुलै, 2021 रोजी मंजुरी  दिली   होती. . . ही योजना 01 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत राबवली जाणार आहे.

22 जुलै 2021 रोजी ECRP-II च्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पूर्वतयारीसाठी 15% आगाऊ रक्कम म्हणून 1827.80 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. तसेच  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आज 35% निधी जारी केला जात आहे, अशा प्रकारे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तयार करण्यासाठी एकूण 50% निधी जारी केला आहे जेणेकरून राज्य/जिल्हा स्तरावर महत्वपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी सुनिश्चित होऊ शकेल.

ही योजना काही केंद्रीय क्षेत्रातील घटक असलेली  केंद्र पुरस्कृत योजना आहे. लहान मुलांची  काळजी आणि आरोग्य पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून, लवकर प्रतिबंध, शोध आणि व्यवस्थापनासाठी तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेला गती देण्याचा उद्देश आहे.

ईसीआरपी- II च्या केंद्र पुरस्कृत योजना (सीएसएस)अंतर्गत, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आपत्कालीन कोविड प्रतिसाद आराखडा (ईसीआरपी) साठी  14744.99 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे प्रस्ताव राज्यांकडून प्राप्त झाले आहेत.

ईसीआरपी- II पॅकेजचा सीएसएस घटक खालील वितरणासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना मदत करेल :

जिल्ह्यांमध्ये 827 बालरोग युनिटची स्थापना  ज्यामुळे 19030 ऑक्सिजन बेड आणि 10440 ICU/HDU बेडची अतिरिक्त निर्मिती होईल.

टेली-आयसीयू सेवा, मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी  प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशात  (वैद्यकीय महाविद्यालये, राज्य शासकीय रुग्णालये किंवा एम्स , आयएनआय  इत्यादी) किमान एक असे 42 बाल चिकित्सा केंद्र,  स्थापन करणे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत 23056 आयसीयू बेड वाढवणे , त्यापैकी 20% लहान मुलांसाठी आयसीयू  बेड असतील.

सध्याच्या CHCs, PHCs आणि SHCs (6-20 बेड युनिट) मध्ये अतिरिक्त बेड जोडण्यासाठी 8010 प्री-फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स तयार करून ग्रामीण, निम -शहरी आणि आदिवासी भागात कोविड -19  संसर्ग वाढल्यामुळे समुदायाची काळजी घेणे. यामुळे  75218 ऑक्सिजन  बेड तयार करण्यात मदत करेल.

दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरे आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या  गरजेनुसार 203 फील्ड हॉस्पिटल्स (50-100 बेड युनिट्स) स्थापन करणे जे 13065 ऑक्सिजन  बेड तयार करण्यात मदत करेल.

वैद्यकीय गॅस पाईपलाईन सिस्टीम (एमजीपीएस) साठी 1450 सुविधांसह   961 लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज टाक्या बसवणे, ज्याचा उद्देश प्रत्येक जिल्ह्यात किमान एक  युनिटला आधार देणे आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *