सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोफत बस सेवा सुरू

Savitribai Phule Pune Universiy

Free bus service started in Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोफत बस सेवा सुरू

मुख्य प्रवेशद्वारापासून ही सेवा उपलब्ध

विद्यापीठाच्या सर्व प्रमुख विभाग व कार्यालयासमोर जवळपास १३ बस थांबे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परिसरात ये-जा करण्यासाठी विद्यापीठाच्यावतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता पासून सुरू होणारी ही सेवा विद्यापीठ परिसरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांना पोहचण्यात मदत करणार आहे. यामुळे विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.Savitribai Phule Pune University

या सेवेमुळे विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना निश्चित मदत होणार आहे. हा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विद्यापीठातर्फे अॅप तयार केले जाणार आहे. ज्यामुळे बस नेमकी कुठे आहे, किती वेळात कोणत्या थांब्यावर पोहचेल यांची माहिती वापरकर्त्यांना मिळेल.

 

डॉ.सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठाचा परिसरात मोठा असल्याने स्वतःचे वाहन नसलेल्या विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी विद्यापीठातर्फे दोन बसेसे देण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून ही सेवा उपलब्ध असून विद्यापीठाच्या सर्व प्रमुख विभाग व कार्यालयासमोर जवळपास १३ बस थांबे सुरू करण्यात आले आहे. भविष्यात विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रतिसाद बघता थांब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी यासंदर्भात फलकही लावण्यात येणार आहेत. याशिवाय येत्या काळात बससेवेसाठी स्वतंत्र उपयोजन (ॲप्लिकेशन) विकसित करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे नियोजन आहे.

विद्यापीठात आल्यावर विद्यार्थी, नागरिकांना आधी खुप पायपीट करावी लागायची. मात्र प्रशासनाने दोन सीएनजी बसेसे पुरवून ही सेवा सुरू केल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. या इको-फ्रेंडली सेवेचा जास्तीत जास्त लोकांना उपभोग घेता येईल यासाठी भविष्यात यात आणखी चांगले बदल करण्यात येईल.

डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

बसचे थांबे

विद्यापीठाचा मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र (जयकर ग्रंथालय), रसायनशास्त्र विभाग, परिक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय केंद्र, मुख्य इमारत, तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वसतीगृह, आरोग्य केंद्र, पुंबा, मुलांचे वसतीगृह, मुख्य प्रेवशद्वार.

बसचे वेळापत्रक

सकाळी १०.३० पासून दर अर्ध्या तासाला

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग घेण्याचे आवाहन
Spread the love

One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोफत बस सेवा सुरू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *