मंगोलियाचे भारतातील राजदुत व मालदीवचे उच्चायुक्त यांची विद्यापीठाला भेट

Savitribai Phule Pune Universiy

The Ambassador of Mongolia to India and the High Commissioner of Maldives visited the university

मंगोलियाचे भारतातील राजदुत व मालदीवचे उच्चायुक्त यांची विद्यापीठाला भेट

पुणे : मंगोलियाचे भारतातील राजदुत ग्यानबोल्ड डयांबजाव आणि मालदीवचे उच्चायुक्त इब्राहीम यांनी त्यांच्या शिष्ठमंडळासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास शनिवारी शैक्षणिक भेट दिली. मंगोलिया, मालदीव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंधाना चालना देण्यासाठी ही भेट घेण्यात आली होती. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव आणि आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत त्यांच्याशी चर्चा केली.Savitribai Phule Pune University

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्रा. संजय ढोले, डॉ. जितेंद्र जोशी उपस्थित होते.कुलगुरू कार्यालयात झालेल्या या बैठकीत भविष्यातील संभाव्य शैक्षणिक सहयोग, सांस्कृतिक उपक्रम आणि विद्यार्थी-मंगोलियन व मालदीव समुदाय यांच्यातील नाते सुदृढ करण्याबाबत तसेच भविष्यातील सहकार्याबद्दल चर्चा करण्यात आली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
भारतातील ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या उल्लेखनीय योगदानाची प्रशंसा
Spread the love

One Comment on “मंगोलियाचे भारतातील राजदुत व मालदीवचे उच्चायुक्त यांची विद्यापीठाला भेट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *