On December 20, the play ‘Sangaichancha Hai’ will be staged in Pune
20 डिसेंबरला ‘सांगायचंच आहे’ या नाटकाचा पुण्यात प्रयोग
इंडो-जर्मन नाटकाचा भारत दौरा.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र आणि युनिव्हर्सिटी ऑफ हेल्डसाईम यांच्या विद्यार्थ्यांद्वारे दरवर्षी नॉन व्हरबल इंडो-जर्मन नाट्यप्रयोग सादर केले जातात. याचाच भाग म्हणून येत्या २० डिसेंबरला ‘सांगायचंच आहे’ या नाटकाचा पुण्यात प्रयोग होणार आहे. बाणेर स्थित ड्रामालय स्कूल ऑफ अॅक्टींगमध्ये हा प्रयोग होणार असून त्याआधी १६ आणि १७ डिसेंबरला मुंबईतही हे प्रयोग होणार आहेत.
‘काही कळेना’ ही नाट्य संस्था प्रायोगिक रंगभूमीवर काम करते. यांद्वारे दरवर्षी नॉन व्हरबल इंडो- जर्मन नाट्यप्रयोग सादर केले जातात. याअंतर्गत ललित कला केंद्राचे माजी विद्यार्थी तसेच युनिव्हर्सिटी ऑफ हेल्डसाईमचे आजी विद्यार्थी मिळून एक नाट्यप्रयोग सादर करत असतात. यावर्षीच्या ‘सांगायचंच आहे’ या नाटकाचे जर्मनीच्या वेगवेगळ्या शहरात एकूण बारा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर आता या नाटकाचा भारत दौरा होत आहे.
मोहिनी गुप्ते ,ऐश्वर्या सांगळे, शिवप्रणव अळवणी ,संकेत बागुल ,म्युरियाम श्मिड्डऊना फिलोमेना वेष्तर,आश्लेषा रोकडे आणि अभिलाषा पॉल हे कलाकार नाटक सादर करणार आहेत. हा प्रयोग संध्याकाळी ७ वाजता होणार असून यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
लावण्यालंकार’ जर्मनीतील पहिला लावणी कार्यक्रम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राची माजी विद्यार्थीनी ऐश्वर्या सांगळे ही जर्मनीमध्ये लावणी सादर करणारी आणि लावणीवर कार्यशाळा घेणारी पहिलीच भारतीय कलाकार ठरली आहे.
ऐश्वर्या हिने आतापर्यंत मुन्स्टर, कलोन आणि ड्रेसडन येथे लावणीच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच कलोन, हांनोवर आणि बर्लिन येथे ‘लाण्यालंकार’ या कार्यक्रमाचे सादरीकरणही केले आहे. जर्मन प्रेक्षकांसमोर लावणी हा नृत्यप्रकार पोहचावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला असून जर्मन प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “20 डिसेंबरला ‘सांगायचंच आहे’ या नाटकाचा पुण्यात प्रयोग”