Citizens benefit from government schemes through Vikisat Bharat Sankalp Yatra in Pune city
पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ
आतापर्यंत २६ ठिकाणी संपन्न झालेल्या यात्रेत ६२ हजार ४२१ नागरिकांचा सहभाग
१० हजार १३५ नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ
पुणे : विकिसत भारत संकल्प यात्रा शहरातील विविध भागात पोहोचत असून याद्वारे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती देण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, उप आयुक्त तथा समन्वय अधिकारी नितीन उदास तसेच विविध विभागातील सहाय्यक आयुक्तांनी यात्रेत सहभाग घेतला आहे.
केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागाळातील नागरिकांना पोहचविण्याच्यादृष्टिने पुणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध ठिकाणी या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत २६ ठिकाणी संपन्न झालेल्या यात्रेत ६२ हजार ४२१ नागरिक सहभागी झाले तर १० हजार १३५ नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून चित्ररथ वाहनाबरोबर केंद्र शासनच्या पी.एम स्वनिधी योजना, आयुष्मान भारत जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, आधार कार्ड अद्यावतीकरण, गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना, पुणे मनपाची शहरी गरीब योजना, मोफत आरोग्य तपासणी अशा विविध योजनांची माहिती वंचित नागरिकांपर्यत पोहोचवण्यात येत आहे.
पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ”