Increase in patients of JN-1 type of Corona in the country
देशात कोरोनाच्या जेएन-1 प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ
नवी दिल्ली : देशात एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे (Corona New Variant JN.1) चिंता वाढली आहे. देशात कोरोनाच्या जेएन-1 प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, एका दिवसात जेएन-1 व्हेरियंटचे १०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सनं आपत्कालीन विभागात तपासणी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, गंभीररीत्या आजारी रुग्णांसाठी १२जागा राखून ठेवल्या जाणार आहेत.
सध्या देशात सर्वत्र थर्टी फर्स्ट आणि न्यू एयर सेलिब्रिशेनचं वातावरण असताना गर्दी होण्याची आणि त्यातून कोरोनाचा प्रसार आणखी वेगाने होण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोविडच्या ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या ४ हजार ९७ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान राज्यात काल ८७ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत १९ नवे रुग्ण आढळले असून, पुणे शहर आणि सांगलीत प्रत्येकी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातल्या कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६५ इतकी असून, जेएन-वन या प्रकारचा संसर्ग झालेल्यांची संख्या १० झाली आहे. तसंच केरळ, कर्नाटक, गुजरातसह दिल्लीमध्येही नव्या जेएन-वन प्रकारचे रुग्ण आढळले आहेत.
राज्यात ८७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून या विषाणूच्या संसर्गामुळे २ जण दगावले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत १९ नवे रुग्ण आढळले असून, पुणे शहर आणि सांगलीत प्रत्येकी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातल्या कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६५ इतकी असून, विषाणूच्या जे एन १ या प्रकारचा संसर्ग झालेल्यांची संख्या १० झाली आहे. तसंच केरळ, कर्नाटक, गुजरातसह दिल्लीमध्ये नव्या जेएन-1 प्रकारचे रुग्ण आढळले आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “देशात कोरोनाच्या जेएन-1 प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ”