विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावावर असल्याचा अभिमान

Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

193rd birth anniversary celebration of Savitribai Phule in the university

विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावावर असल्याचा अभिमान – डॉ. सुरेश गोसावी

विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती साजरी

पुणे : भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या नावे पुणे विद्यापीठ असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.First female teacher Krantijyoti Savitribai Phule,

रताच्या पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज १९३ वी जयंती. त्यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, हैद्राबादमधील ईएफएल विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) माया पंडीत- नारकर , प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) विजय खरे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या श्रीमती बागेश्री मंठाळकर, डॉ. संदीप पालवे, डॉ. रविंद्र शिंगणापुरकर, श्रीमती ज्योत्स्ना एकबोटे, वित्त व लेखा अधिकारी श्रीमती. चारूशिला गायके, अर्थशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. विलास आढाव, डॉ. मनोहर जाधव आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

समाजातील असमानतेमुळे स्त्रीयांना शिक्षण घेता येत नसताना सावित्रीबाईंनी असामान्य धैर्य दाखवत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच नाकारात्मक प्रथेवर बंदी घालण्याचे काम करून प्रगतीशील समाजाचा पायाही त्यांची रचला असल्याचे डॉ. गोसावी यावेळी म्हणाले. तर सावित्रीबाईंनी त्यावेळी समाजातील महिलांना शिक्षणाद्वारे त्यांच्या मुक्तीची द्वारं कशी उघडता येईल हे सांगून ज्ञानाच्या उर्जेतून येणारा आत्मविश्वास त्यांना मिळवून दिला. सावित्रीबाई स्त्रीयांना नुसत शिक्षण देऊन थांबल्या नाहीत तर त्यांच्यावर होणाऱ्या विविध अत्याचाराच्या विरोधातही त्या उभ्या राहिल्या त्यामुळे त्यांना स्त्री मुक्तीची जननी म्हणणे वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन हैद्राबादमधील ईएफएल विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) माया पंडीत- नारकर यांनी केले.

यावेळी त्यांनी जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची मूल्ये उपस्थितांना समजावून सांगितली. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव यांनी तर सुत्रसंचालन शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गीता शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
यशोगाथा – “सुमेधा गृह उद्योग”
Spread the love

One Comment on “विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावावर असल्याचा अभिमान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *