9 International Students Eligible for PhD in Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडीसाठी ९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पात्र
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्रांतर्गत घेण्यात येणाऱ्या पीएचडी प्रवेश परिक्षेत ९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विद्यापीठाशी संलग्न विविध विभाग, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया आयोजित करण्यात येते. यावर्षी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इराण, इराक, दक्षिण कोरिया, मॉरिशस, तैवान आणि तुर्की या ८ देशांतील एकूण १३ विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. २२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या या परिक्षेत ९ विद्यार्थी पीचडीसाठी पात्र ठरले आहेत.
२०१५ पासून विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय केंद्र यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. परिक्षेचे स्वरूप ऑनलाइन झाल्यामुळे या परिक्षेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा. (डॉ.) विजय खरे यांनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी दर ३ महिन्यात ही परिक्षा घेण्यात येते. सध्या २० देशातील १२४ विद्यार्थी विद्यापीठाशी संलग्न विविध विभाग, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये पीएचडी करत आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडीसाठी ९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पात्र”