Tamasha Samradhni Withabai Narayangavankar Lifetime Achievement Award
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार
ज्येष्ठ कलावंत हिराबाई कांबळे आणि अशोक पेठकर यांना जाहीर
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : राज्य शासनाच्यावतीने तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२१ व २०२२ या वर्षातील तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार अनुक्रमे श्रीमती हिराबाई कांबळे आणि अशोक पेठकर यांना जाहीर झाला आहे. दोन्ही पुरस्कारार्थींचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य शासनाने तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवन गौरव पुरस्काराचे पुरस्कार्थी निवडण्यासाठी निवड समिती गठीत गठित केली होती. या समितीने तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारासाठी श्रीमती हिराबाई कांबळे ( सन २०२१) आणि श्री.अशोक पेठकर (सन २०२२) यांची निवड केली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार”