Maharashtra is the hub of Buddhism (Buddhist thought) – Dr Niraj Kumar
महाराष्ट्र हा बुद्धीजमचा हब आहे – डॉ. निरज कुमार
विद्यापीठात ‘महाराष्ट्राचा बौद्ध वारसा’ परिषदेचे उद्धाटन
पुणे १५ – महाराष्ट्रात जवळपास १ कोटी जनता बुद्धीजमचे (बुद्ध विचारांचे) अनुसरण करते. त्यामुळे महाराष्ट्र हा ‘बुद्धीजम’चा हब आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातील बौद्ध आणि तिबेटी संस्थेचे संचालक डॉ. निरज कुमार यांनी केले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘महाराष्ट्राचा बौद्ध वारसा’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्धाटनाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी व्हिएतनामचे कॉन्सुलेट जनरल श्री. ले क्वांग बिएन, ,डेप्यूटी कॉन्सुलेट जनरल ट्रॅन फुओंग आन्ह, डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्र-कुलगुरू प्रा. प्रमोद पांडे, संस्कृत एवं शब्दलेखन विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद जोशी, महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, उप-संचालक श्री. हेमंत दळवी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ). पराग काळकर, प्रभारी कुलगुरू प्रा.(डॉ). विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशीला गायके, प्रा. प्रभाकर देसाई, पाली व बुद्धीष्ठ स्टडीजचे विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर उपस्थित होते.
भारतातील जवळपास १२०० लेण्यांपैकी दोन तृतीयांश लेण्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. यावरून भगवान बुद्धांच्या जीवनकाळातच महाराष्ट्राच्या भूमीवर बौद्ध धर्माचा प्रसार झाला असल्याचे कळते, असेही डॉ. निरज कुमार यावेळी म्हणाले. यावेळी विभागातर्फे प्रकाशित बौद्ध पारिभाषिक शब्दकोशावर भाष्य करताना चॅट जीपीटीच्या काळात विद्यापीठाचा पाली विभाग ५ भाषेत शब्दकोश तयार करून तत्वज्ञानमधील बहुभाषिकता या बुद्धाच्या विचारांचे पालन करत असल्याचेही डॉ. कुमार यावेळी म्हणाले. तर महाराष्ट्राला बुद्धाचा वारसा मोठ्या प्रमाणात लाभला आहे. विद्यापीठाच्या पाली विभागातर्फे सुरू असलेल्या बौद्ध पारिभाषिक शब्दकोशामुळे बुद्धांच्या विचारांचा प्रसार करणे सोपे होईल. तसेच याचा फायदा केवळ देशालाच नाही जगाला होणार असल्याचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर म्हणाले. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारे बुद्धाची उपासना केली जाते. सर्वांची पद्धत जरी वेगळी असली तरीही त्यामगचा त्यांचा विचार एकच आहे आणि तो म्हणजे जगात शांती प्रस्थापित करण्याचा, असे प्रतिपादन प्रभारी कुलसचिव प्रा.( डॉ.) विजय खरे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर यांनी केले. १८ ते २० जानेवारी अशा तीन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत ६ आंतरराष्ट्रीय आणि १९ राष्ट्रीय संशोधक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत.
शब्दकोशाचे प्रकाशन
या कार्यक्रमात विद्यापीठाच्या पाली विभागद्वारे ‘बौद्ध पारिभाषिक शब्दकोशा’चा ७ व्या खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभागात ‘बौद्ध पारिभाषिक शब्दकोशा’चा प्रकल्प सुरू आहे. हा शब्दकोश पाली, संस्कृत, तिबेटी, इंग्रजी आणि चिनी या ५ अभिजात भाषांमध्ये बौद्ध पारिभाषिक शब्दांचे अर्थ स्पष्ट करतो. प्रत्येक खंडात १०० शब्द असे एकूण ५० खंड म्हणजेच पाच हजार शब्दांचा कोश बनविण्यासाठी पाली विभाग काम करत आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “महाराष्ट्र हा बुद्धीजमचा हब आहे – डॉ. निरज कुमार”