मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण २३ जानेवारीपासून

Mantralaya मंत्रालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

An actual survey to check the backwardness of the Maratha community from 23 January

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण २३ जानेवारीपासून

सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पूर्वी पूर्ण होणारMantralaya मंत्रालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार आहे . राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फ़त करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार करण्यात आले आहे.२३ जानेवारी २०२४ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मार्फत कळविण्यात आले आहे.

२० जानेवारी २०२४ रोजी जिल्ह्याच्या व महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्याच्या व वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना सॉफ़्टवेअर वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षक २१ व २२ जानेवारी २०२४ रोजी संबंधित तालुक्याच्या, वॉर्डच्या ठिकाणी तालुक्यातील, वॉर्डमधील सर्व नियुक्त कर्मचा-यांना प्रशिक्षण देतील व २३ जानेवारी २०२४ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होईल. हे सर्वेक्षण दि. ३१ जानेवारी २०२४ पूर्वी पूर्ण होणार आहे.

या सर्वेक्षण कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आयोगामार्फ़त ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
नागरिकांना अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा मिळणार
Spread the love

One Comment on “मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण २३ जानेवारीपासून”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *