Prohibited stock worth Rs 47 lakh seized in Pune city
पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त
पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे शहरात टोनी दा ढाबा, पाषाण सर्व्हिस रोड, पाषाण येथील धडक मोहीमेत एमएच ४६ एआर ४९७३ या वाहनाचा पाठलाग करून ४७ लाख २२ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित साठा व एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
औषध प्रशासनाच्या मंत्रालयीन कार्यालयातून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहमेअंतर्गत १ वाहन जप्त करण्यात आले असून चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकासह तिघांवर एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत.
जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातुन राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदर्थावर उत्पादक साठा, वितरण, वाहतुक तसेच विक्री यावर १ वर्षाकरीता बंदी घातलेली आहे.
प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्री बाबतची माहिती असल्यास जागरुक नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त”