Block for installation of Gantry on Yashwantrao Chavan Expressway
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक
२३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेदरम्यान हायवे वर गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेदरम्यान हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी २४.२५० व पुणे वाहिनीवर कि.मी ५६.९०० (कुसगाव वाडी ) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार असल्याने या कालावधीत वाहतूक वळविण्यात आली आहे.
पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन कि.मी ५५.००० वरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून मार्गस्थ होतील.
पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट कि .मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.
पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी व जड -अवजड वाहने ही खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट कि.मी ३२.५०० येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.
मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरून पुणे बाजुकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ होतील.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक”