शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Department of Agriculture Govt of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Appeal to farmers to apply for study tours abroad

शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्यातील शेतकऱ्याचे देशाबाहेर दौरे आयोजित करण्यात येणार

योजनेंतर्गत जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झरलंड, ऑस्ट्रीया, न्यूझीलंड, नेदरलंड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी संभाव्य देशांची निवड

पुणे : विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्याचे देशाबाहेर दौरे आयोजित करण्यात येणार असून इच्छुकांना ३१ जानेवारी २०२४ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Department of Agriculture Govt of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विस्तार कार्यक्रमाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध पिकांची उत्पादकता, पीक पध्दतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषि उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषि प्रक्रियेमधील अद्ययावत पद्धती यामध्ये आमुलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झरलंड, ऑस्ट्रीया, न्यूझीलंड, नेदरलंड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. अभ्यास दौऱ्याकरिता लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. त्याच्या नावे चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उतारा असावा. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र (प्रपत्र १) अर्जासोबत सादर करावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जासोबत आधार पत्रिकेची प्रत द्यावी.शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असावा. शेतकऱ्याचे वय २५ ते ६० वर्षे असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक असावा. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार इ. नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.

शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरीता सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५०टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रु. १ लाख रुपये प्रती लाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान देण्यात येईल. शेतकऱ्याचे त्याचे बँकचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर दौऱ्याचा १०० टक्के खर्च प्रवासी कंपनीकडे आगावू स्वतः भरावा लागेल व दौरा पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल.

इच्छुक शेतकऱ्यांना ३१ जानेवारी २०२४ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करून अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
‘महादुर्ग’ महोत्सव पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा
Spread the love

One Comment on “शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *