Book exhibition on the occasion of the Marathi language conservation fortnight
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
शासकीय विभागीय ग्रंथालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पुणे येथील शासकीय विभागीय ग्रंथालय येथे २८ जानेवारीपर्यंत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून वाचक, सभासद, विद्यार्थी, नागरीक अशा सर्व ग्रंथप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे प्र. ग्रंथपाल सुरेश द. रिद्दीवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रख्यात मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी श्री. रिद्दीवाडे म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हावी तिचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सर्वांचीच भूमिका फार महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त वाचकांनी पुस्तके वाचली पाहिजेत व मराठी भाषेची महती व व्यापकता विषद करणारे संदर्भ ग्रंथ व ज्ञानकोश सर्वांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास ग्रंथालयाचे अधिकारी कर्मचारी, अभ्यासिकेतील विध्यार्थी, नागरीक तसेच वाचक उपस्थित होते. शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे, न. वि. गाडगीळ शाळा, शनिवार पेठ, पुणे- ३० येथे हे ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी दिनांक २८ जानेवारीपर्यंत खुले असणार आहे, असेही ग्रंथालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन”