‘स्कील ऑन व्हील’ बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

Maharashtra Development Board For Skill Development

The ‘Skill on Wheel’ bus will be inaugurated by Chief Minister Eknath Shinde tomorrow

‘स्कील ऑन व्हील’ बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

  • फिरत्या बसच्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान
  • कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून १५ ते ४५ वर्षे वयोगटातील गरजू युवक युवतींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण
  • कार्यक्रमांतर्गत ब्युटी ॲण्ड मेकअप ट्रेड, इलेक्ट्रिकल डॉमेस्टिक अप्लायन्सेस व कंप्यूटर एज्युकेशन या व्यवसायांच्या कार्यशाळा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत स्कील सेंटर ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत फिरत्या बसचे लोकार्पण वर्षा निवासस्थानी २६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असेल.Skill Development, Employment & Entrepreneurship Department

मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत स्कील सेंटर ऑन व्हील संकल्पना राबवली जाणार आहे. याद्वारे फिरत्या बसच्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यातील युवकांना करिअर मार्गदर्शन देणे, त्यासाठी आवश्यक कौशल्य विकास उपक्रमाबाबत माहिती देणे, त्याचे प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांचे अर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत मिळेल.

या कार्यक्रमांतर्गत ब्युटी ॲण्ड मेकअप ट्रेड, इलेक्ट्रिकल डॉमेस्टिक अप्लायन्सेस व कंप्यूटर एज्युकेशन या व्यवसायांच्या कार्यशाळा बसमधे आयोजित करण्यात आल्या आहेत.

बसच्या चालन, परिवहन, देखभाल आणि दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाबरोबर ५ वर्षांचा करार करण्यात आला आहे. राज्यातील कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून १५ ते ४५ वर्षे वयोगटातील गरजू युवक युवतींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळेल. लाभार्थ्यांना त्या मिळालेल्या कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल, समजतील मागास घटकांना आत्मनिर्भर बनवून मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
पशुधनाचे युनिक टॅगिंग करून ऑनलाईन नोंदणी करण्याचे पशुपालकांना आवाहन
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *