A boon for multi-specialty hospital patient care
मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी वरदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तायवाडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन
नागपूर : सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून डॉ.बबनराव तायवाडे काम करीत आहेत. नागपूर मेडिकल हब म्हणून विकसित होत असताना दक्षिण पश्चिम नागपुरात उभारण्यात आलेले तायवाडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी वरदान ठरणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
तायवाडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अद्ययावत आणि अत्याधुनिक रुग्ण सेवेने सज्ज असलेले तायवाडे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मधील रुग्णसेवेचा लाभ दक्षिण व पश्चिम नागपुरातील तसेच आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांना होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मध्य भारतातील विविध भागातून रुग्ण नागपुरात उपचारासाठी येत असतात. या भागामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची आवश्यकता होती. तायवाडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे ती पूर्ण झाली असल्याचे मत श्री. फडणवीस यांनी व्यक्त केले.
मध्य भारतातील किफायतशीर व खात्रीलायक उपचाराचे केंद्र म्हणून नागपूरची ओळख होत आहे येथील वैद्यकीय व्यवसायाने आपल्या निष्ठेने व सेवाभावाने आपले नावलौकिक मिळवले आहे. आरोग्य हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरातील वैद्यकीय क्षेत्रात याच पद्धतीने तायवाडे हॉस्पिटलमुळे नागपुरच्या वैद्यकीय क्षेत्राचा लौकिक वाढीस लागेल, असा विश्वास हॉस्पीटलचे संचालक डॉ.शौनक तायवाडे यांनी व्यक्त केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी वरदान”