State-level kabaddi tournament for male and female industrial workers on February 2
पुरुष व महिला औद्योगिक कामगारांसाठी २ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
२७ वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि महिलांसाठी २२ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २ ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत
मुंबई : राज्य कामगार विभागांतर्गत कामगार कल्याणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठी २७ वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि महिलांसाठी २२ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २ ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे. ही स्पर्धा हुतात्मा बाबू गेनू, गिरणी कामगार क्रीडा भवन प्रभादेवी, येथे होणार आहे.
या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन २ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे आणि शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, अपर पोलीस महासंचालक डॉ.रवींद्रकुमार सिंगल आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
विकास आयुक्त डॉ.एच. पी. तुम्मोड, कामगार आयुक्त सतीश देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, कल्याण आयुक्त रविराज इळवे यावेळी उपस्थित राहणार आहेत, असे कळविण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पुरुष व महिला औद्योगिक कामगारांसाठी २ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा”