Universities and colleges should implement new educational policies for the next academic year
पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र नॅक मूल्यांकन व मानांकन प्रक्रियेत अव्वल स्थानावर
मुंबई : पुढील शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
जुहू येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या वतीने आयोजित नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी चर्चासत्रात मंत्री श्री. पाटील बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव, राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी गठित सुकाणू समितीचे सदस्य, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास चे राष्ट्रीय सचिव अतुलजी कोठारी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू रुबी ओझा, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम क्रेडिट फ्रेमवर्क (N Cr F) स्वीकारून 2023-24 पासून अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 200 स्वायत्त महाविद्यालय आणि 1700 पदवीत्तर सेंटरचा समावेश.
तसेच महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनाबाबत राज्य शासनाने अग्रह धरला यामध्ये काही शिथिलता आणण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सोबत चर्चा करून नोंदणीची रक्कम कमी करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र नॅक मूल्यांकन व मानांकन प्रक्रियेत अव्वल स्थानावर आला आहे असे सांगून सन 2024-25 शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व महाविद्यालयात धोरणाची अंमलबजावणी करावीच लागेल, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुनील बी भिरुड यांची कुलगुरू पदी नियुक्ती झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच एसएनडीटी महिला महाविद्यालयांच्या विद्यार्थिनीने तयार केलेले वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला मंत्री श्री. पाटील यांनी भेट देऊन प्रत्येकाशी चर्चा करून त्यांना प्रोत्साहन दिले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पुढील शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी”