रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पेठ नायगाव येथे प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन

Awareness programs at Peth Naigaon under the Road Safety Campaign

रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पेठ नायगाव येथे प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन

रस्ता सुरक्षा प्रबोधनपर मोटर सायकल फेरीचे आयोजन

Regional Transport Office, Pune. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.
Regional Transport Office

पुणे : रस्ता सुरक्षा अभियान १४ फेब्रुवारीपर्यंत राबविले जात असून प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या संयुक्त विद्यमाने अल्ट्राटेक सिमेंट पेठ नायगाव येथे कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरिता रस्तेसुरक्षा प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर देसाई, सहायक मोटर वाहन निरीक्षक दिनेश पाटील, अल्ट्राटेक सिमेंट प्लांट हेड निशा जैन, लॉजिस्टिक हेड मधुकर सांगा, इमरान खान आदी उपस्थित होते.

श्री. देसाई यांनी वाहन चालविताना मोबाईल वापराचे धोके तसेच वेगमर्यादचे पालन, सीटबेल्ट हेल्मेट यांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. श्री. पाटील यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले. रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृती व नागरिकांचे प्रबोधन करण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी गोल्डन अवरमध्ये घ्यावयाची काळजी व अपघात समयी करावयाची मदत या विषयावर पथनाट्य सादर केले. रस्ता सुरक्षा प्रबोधनपर मोटर सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा, पेठ नायगाव यांच्याकडून आयोजित केलेल्या पायी फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
चालू वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्जवाटप
Spread the love

One Comment on “रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पेठ नायगाव येथे प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *