संशोधन संस्थांनी क्लिनिकल चाचण्यांमध्ये सामील व्हावे

Savitribai Phule Pune Universiy

Research organizations should be involved in clinical trials

संशोधन संस्थांनी क्लिनिकल चाचण्यांमध्ये सामील व्हावे – डॉ.अमोल कारा

‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ परिषदत संपन्न

Savitribai Phule Pune Universityपुणे : माइटोकॉन्ड्रियल रोगाच्या अनुवांशिकदृष्ट्या पुष्टी झालेल्या रुग्णांची पुरेशी संख्या असलेल्या क्लिनिकल चाचणी साइटची कमतरता आहे. या विषयावर तातडीने लक्ष देण्याची गरज असून जगभरातील चिकित्सक आणि संशोधन संस्थांनी मायटोकॉन्ड्रियल रोग उपचारांसाठीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये सामील व्हावे, असे आवाहन आनुवंशिकता आणि माइटोकॉन्ड्रियल आजारांच्या तज्ज्ञ आणि हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिकलमधील प्राध्यापिका डॉ. अमोल कारा यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एक सत्रात त्या बोलत होत्या. या प्रसंगी या परिषदेचे मुख्य आयोजक प्रा.(डॉ.) राजेश गच्चे आणि जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. स्मिता झिगांर्डे उपस्थित होत्या.

माइटोकॉन्ड्रियल रोग हे जटिल अनुवांशिक विकारांचे एक समूह आहे. ज्यामुळे अनेक अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे डॉ. अमोल कारा यांनी यावेळी सांगितले. तसेच यामुळेच या आजाराच्या निदान आणि उपचारामध्ये अनेक आव्हाने येतात. माइटोकॉन्ड्रियल जीवशास्त्र समजून घेण्याची व्यवस्था उपलब्ध असूनही या दुर्बल परिस्थितीसाठी अजूनही प्रभावी उपचार विकसित होऊ शकला नसल्याची खंत डॉ. कारा यांनी यावेळी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाचा बायोटेक्नॉलजी विभाग, अमेरिकेतील रटगर्स स्कूल ऑफ बायोमेडिकल अँड हेल्थ सायन्सेस आणि रोझवेल पार्क कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. माइटोकॉन्ड्रिया, सेल डेथ आणि मानवी रोग, मानवी रोग व्यवस्थापनातील संगणकीय यश आणि आरोग्यसेवेतील मूलभूत आणि वैद्यकीय संशोधन आणि परिवर्तन या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये अलीकडील प्रगती अधोरेखित करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून ५० हून अधिक शास्त्रज्ञांनी सार्वजनिक आरोग्याविषयी चर्चा केली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
राज्यातील निवासी डॉक्टरांनी प्रस्तावित संप मागे
Spread the love

One Comment on “संशोधन संस्थांनी क्लिनिकल चाचण्यांमध्ये सामील व्हावे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *